होतास जेव्हा तू जवळ
जीवन माझे खूप आनंदी होते
मन ही माझे खुुश
आणि चेहर्यावर माझ्या हसू होते
माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हे
मनासारखे घडत होते.
गुंतुन तुझ्यात मी तुझीच होऊन जात होते..कसे झाले ते अचानक एक आभाळ वादळ कोसळले...सगळे विचार अगदी मनात येऊन गुंतले
कारण आला तो क्षण
कसा तू दूर गेलास.
आयुष्यातून माझ्या सहज लांब झालास
वाटत होते येऊन तुझापाशी घट्ट मिठी मारावी
तुझीच होऊन पुन्हा तुझीच होऊन जावी
पण मला काहीच कळत न्हवते
मन हि माझे एकत न्हवते
तुझ्यासाठी माझे मन फार फार झुरत होते
पण नंतर मला कळून चुकले
तुला मी दूर गेले तर काही ही फरक वाटतं न्हवते
एकदाच ठरवलं मी माझ्या मनाशी
विसरून जावे तुला
जीवनात पुढे जाऊन
मागे टाकून तुला.
आत्ता जगत आहे त्याच्याशिवाय
नाही अडलेल काही माझं.
कोणाशिवाय काही अडलं नाही हे पटलं बरं का तुझं.
पण मनाचा त्या कोपरा पर्यंत अजून ही तू असतोस
हळूच येऊन माझ्या मनात तू रुजतोस
पण विसरले आहे तुला मनावर दगड ठेवून
कुलूप लावले त्या मनाला ते ऐकत नाही
म्हणून.
~ रेणुका पिल्ले
(28 July 2018)
Comments
Post a Comment